Posts

धक्कादायक ! अल्पवयीन बलात्कार पीडितेने बाळाला जन्म दिल्यानंतर शौचालयातच केले फ्लॅश ; अन् पुढे जे घडले ते...

एका अल्पवयीन मुलीवर एका वीस वर्षाच्या तरुणानं कथितरित्या बलात्कार केला. आणि या बलात्कारातूनच अल्पवयीन पीडित मुलगी गर्भवती राहिली. परंतु पुढे आश्चर्यचकित करणारे घडलं. बलात्कार पीडित अल्पवयीन मुलीने वेळेआधीच नवजात बाळाला जन्म दिला आणि त्या अल्पवयीन मुलीने त्या बाळाला हॉस्पिटलच्या शौचालयातच फ्लॅश केल्याची धक्कादायक घटना घडलीय. मुलीने या बाळाला शौचालयातच जन्म दिला आणि तिथेच फ्लॅश करून ती मुलगी शौचालयातून बाहेर आली. पुढे तिने कुणालाही या बाबतीत सांगितले नाही. परंतु त्या मुली नंतर शौचालयात गेलेल्या व्यक्तीला बाळाचे अवशेष आढळले आणि त्या व्यक्तीने याबाबत पोलिसांना कळविले. मग पोलीस तपासादरम्यान त्या बलात्कार पीडित अल्पवयीन मुलीनेच त्या नवजात बाळाला जन्म देऊन त्याला शौचालयात फ्लश केल्याची माहिती उघड झाली. नंतर पोलिस चौकशीत या अल्पवयीन मुलीने या प्रकरणाची कबुली देऊन माझ्यावर 20 वर्षीय तरुणाने बलात्कार करून गर्भवती केल्याचं त्या अल्पवयीन मुलीने पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्या मुलीवर बलात्कार झालाय आणि ती सहा महिन्याची गर्भवती आहे असं त्या मुलीने कोणालाच सांगितलं नव्हतं. या

'कपडे काढ, नाक घास, झाडू मार...' विद्यार्थिनीचा छळ तर, प्राध्यापकासह तिघांविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

 हदगाव : आठ दिवसापूर्वी कॉलेजमध्ये गेलेल्या एका विद्यार्थिनीला अंगावरील कपडे काढायला लावल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे घडला आहे. हदगाव तालुक्यातील गोविंदराव पऊळ नर्सिंग कॉलेजमधील एका विद्यार्थीनीने हदगाव पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून प्राध्यापकासह तीन मुलींनी विरुद्ध हदगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पीडित मुलगी वस्तीगृहात नवीन रहायला आली असल्याने वसतीगृहातील काही सिनियर मुलींनी तिच्यावर दमदाटी करून छळ केला आहे. रविवारी (दिनांक 12) दुपारी हा संपूर्ण प्रकार घडला. सीनियर मुलींनी कपडे काढ, नाक घास, झाडू मार, अशा प्रकारची रॅगिंग केली आहे. पीडित मुलगी या संपूर्ण घटनेची तक्रार करायला भगीरथ शिंदे या शिक्षकांकडे असता, प्राध्यापक शिंदे सरांनी या संपूर्ण प्रकरणावर कारवाई केली नाही. याउलट शिंदे सरांनी पीडित मुलीला वाईट हेतूने स्पर्श करायला सुरुवात केली. शिक्षकांनीच उलट धमकावल्याचं पीडित मुलीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. पीडित मुली सोबत घडलेली संपूर्ण घटना तिने आपल्या वडिलांना सांगितली. पीडित मुलगी व तिचे वडील मंगळवारी हदगाव पोलिस ठाण्यात दाखल झाले, आणि त्यांनी हदगाव

महिला आयोगावर 'रावणाला मदत करणारी शूर्पणखा बसवू नका' चित्रा वाघ यांची रूपाली चाकणकरांवर टीका

महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच नाव निश्चित झालं आहे. आणि आज त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार असल्याच बोलले जात आहे. मात्र त्याआधीच भाजपच्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विटरवरून चाकणकरांवर घणाघाती हल्लाबोल केलाय. रावणाला मदत करणारी शूर्पणखा बसवू नका असा बोचरा वार भाजपच्या चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांचं नाव न घेता केला. जर रुपाली चाकणकरांची निवड झाली, तर प्रत्येक वेळी सरकारचे नाक कापलं जाईल असा सल्ला चित्रा वाघ यांनी राज्य सरकारला दिला आहे. नेमकं काय म्हटल्या चित्रा वाघ महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरताहेत, पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही हे लाजिरवाणे आहे, अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल, तर किमान रावणाला मदत करणारी 'शूर्पणखा' बसवू नका. अन्यथा प्रत्येक वेळी सरकारचचं नाक कापलं जाईल. चित्रा वाघ यांच्या टीकेनंतर जेव्हा रूपाली चाकणकर यांना त्यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी यासंदर्भात 'मला कुठलीही प्रतिक्रिया द्यायची नसल्याचं म्हटल आहे'.

Indurikar Maharaj On Nilesh Lanke : इंदुरिकर महाराजांचा निलेश लंकेना हत्तीचा उल्लेख करून सल्ला...

नगर : पारनेरच्या तहसिलदार ज्योती देवरे यांच्या कथित ऑडियो क्लीपमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके हे वादत सापडल्याने निवृत्ती महाराज इंदुरिकर यांनी आमदार निलेश लंके यांचं भरभरून कौतुक केलं. " रस्त्याने जाताना कितीही कुत्री भुंकली तरीही हत्ती त्याकडे दुर्लक्ष करून चालत राहतो, तसे लंके तुम्हीही विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करून पुढे वाटचाल करीत रहा. येणारी 25 वर्ष तुम्हाला धोका नाही; असा सल्लाच निवृत्ती महाराजांनी निलेश लंकेंना दिला. शरद पवारांच्या नावाने आमदार निलेश लंके यांनी सुरू केलेल्या कोविड केअर सेंटर मध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आलं. याप्रसंगी निवृत्ती महाराज देशमुख यांना कीर्तनासाठी निमंत्रित करण्यात आलं होतं. किर्तन सुरू असताना निवृत्ती महाराज समाज प्रबोधन करताना आमदार निलेश लंके यांचं तोंडभरून कौतुक केले. कोविड सेंटरच्या माध्यमातून सुरू असलेल्या रुग्ण सेवेच्या कार्याचही त्यांनी कौतुक केलं. इंदुरिकार म्हणाले, " राज्यातील बरेच आमदार-खासदार साखर सम्राट, शिक्षण सम्राट तर कोणी उद्योगपती आहेत. मात्र त्या कोणालाही असं सेवाभावी कार्य करणार कोविड

गांधी-आंबेडकर वारसा समजून घेताना

महात्मा गांधी भारतातील सर्वच जाती धर्माने पंथांनी स्वीकारलेला त्याच बरोबर सर्वाधिक टीका झालेला महान व्यक्ती. गांधींवर आज पर्यंत जगभरात लाखाहून अधिक पुस्तके लिहिली गेली. तसेच त्यांच्यावर अनेक आरोपही झाले. मृत्यूच्या सत्तर वर्षांनंतरही ते होतच असतात. त्यातील एक म्हणजे गांधी जातीयवादी, वर्णव्यवस्था मानणारे होते. अलीकडेच गांधी विरोधकच नव्हे तर काही डाव्या विचारवंतांनी देखील गांधींवर असे आरोप केले होते हे आरोप अर्धसत्य ठरतात हे मात्र निश्चित. गांधीशी सार्वजनिक जीवनाच्या सुरुवातीला चातुर्वर्ण्य व्यवस्था मानत होते हे सत्य असले तरी शेवटपर्यंत ते याच मतावर कायम राहिले असे नाही जातीय व्यवस्थेचे नंतर ते प्रखर टीकाकार बनले सामाजिक समतेसाठी कायम प्रयत्नशील राहिले 1918 साली महात्मा गांधी जाहीरपणे म्हणतात या देशाच्या सर्वोच्चपदी भग्याची वा चांभाराची मुलगी असणं हे माझं स्वप्न आहे आणि तोच माझ्या स्वातंत्र्याचा अर्थ आहे. नागपूरच्या 1920 च्या काँग्रेस अधिवेशनात अस्पृश्यता निवारणाचा ठराव ते स्वतः मांडतात येरवडा तुरुंगातून सुटल्यावर गांधींनी साडेबारा हजार मैलाची हरिजन यात्रा काढली होती याच यात्रेदरम्यान त्

"लागिर झालं जी" मालिकेतील कलाकारांच्या जीवाला धोका; खळबळजनक पोस्ट करत दिली माहिती

छोट्या पडद्यावरील 'लागिर झालं जी' ही सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय मालिका आहे. मालिकेतील गेल्या दोन दिवसापूर्वी चर्चेत असणारा अभिनेता म्हणजे नीतीश चव्हाण. या मालिकेतील अभिनेता डॉ. ज्ञानेश माने यांचे अपघाती निधन झालं. मात्र सोशल मीडियावर या कलाकार ऐवजी नीतीश चव्हाण (अज्या) चा फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होऊन नितीशचाच अपघाती मृत्यू झाल्याचं बोललं जात होतं. त्यामुळे नितीश चव्हाण (अज्या) च्या चाहत्या वर्गाकडून दुःख व्यक्त केलं जात होते. मात्र याबाबत काही वेळातच खुलासा होऊन सत्य समोर आलं आणि नेमकं कोणाचा अपघाती मृत्यू झाला हे स्पष्ट झालं. आणि नीतीच्या चाहत्यानी दिलासा व्यक्त केला. नीतीश चव्हाण 'लागिर झालं जी' या मालिकेतील अज्याच्या भूमिकेने लाखो लोकांची मनोज जिंकली आणि त्यांच्या मनात जागा निर्माण केली. आणि अज्याच्या भूमिकेमुळे त्याचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला. आता अशातच नितीश चव्हाणने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून एक पोस्ट शेअर केली आहे. आणि हिच पोस्ट बघून त्याच्या चाहत्यांना धक्काच बसला आहे. या पोस्टमध्ये नितीश चव्हाणने एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये नीतीश एक फलक घेऊन

World Photography Day : जागतिक फोटोग्राफी दिन का साजरा केला जातो ?

नमस्कार आज आपण बघणार आहोत की जागतिक फोटोग्राफी दिन का साजरा केला जातो ? यामागे नेमके कोणते कारण आहे आणि फोटोग्राफीचा इतिहास नेमका काय आहे ? जगातली पहिली सेल्फी कोणाची आहे ? चला तर मग बघुया फोटोग्राफी दिन साजरा करण्यामागची कारण... १९ ऑगस्ट ला जागतिक फोटोग्राफी दिन साजरा केला जातो. (19 August Celebrate World Photography Day) यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे जगातल्या प्रत्येक फोटोग्राफर्स ने काढलेल्या फोटोला जगातील फोटो प्रेमींना बघता यावे, आणि फोटोग्राफर्सचं कौतुक व्हावं. या उद्देशाने जागतिक फोटोग्राफी दिवस साजरा केला जातो. जागतिक फोटोग्राफी दिन कधी पासून साजरा केला जातो... जागतिक फोटोग्राफी दिवसाची २०१० पासून सुरुवात झाली होती, मात्र यामागचा इतिहास खूप जुनाच आहे. फ्रेंच मधील दोन व्यक्तींनी छायाचित्र प्रक्रिया सुलभ करण्यासाठी 'डॅगुएराटाईप्स' चा शोध लावला. फ्रेंच अकॅडमी ऑफ सायन्स ने ९ जानेवारी १८३७ साली अधिकृतपणे या दोन व्यक्तींनी शोध लावलेल्या 'डॅगु्यरिओटाइप' चा शोध जाहीर केला. त्या दोन शोध लावणाऱ्या व्यक्तींची नावे 'निसफोर निपसे आणि लुईस डॅगुएरे' अशी होती. हा शोध जा